हिमालयातील पूर

हिमालयातील पूर :

  • हिमालय २४०० किमी पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरला असून त्याची रुंदी २०० ते ४०० किमी आहे.

हिमालयात सर्वाधिक पूर येण्याची कारणे :

अ) तीव्र पर्जन्य

ब) भूस्खलन

क) हिमनदीचा बांध तुटणे

ड) ढगफुटी

  • भूशास्त्र, भौगोलिक स्थिती, पाणलोट क्षेत्र, तलाव, भूस्खलन क्षेत्र, पर्जन्य यांच्या एकत्रित परिणामामुळे पूरस्थिती निर्माण होते.
  • नदीच्या पातळीतील ऊर्ध्व वाढ, पुराचे वाढते प्रमाण, प्रवाहाचा वेग, पूर मैदानाच्या बाजूकडील पाणी इत्यादी घटकांचा अभ्यास करून फ्लड मॅपिंग केले जाते.
  • पूर निवारण यंत्रणेचे दाट नेटवर्क, विविध पाणलोट क्षेत्रात रडार स्थापित करणे; तसेच इंटरनेटच्या सहाय्याने सर्व रिअल टाइम डेटा पूर व्यवस्थापन केंद्रांना उपलब्ध करून देणे यांसारख्या कृतींद्वारा पुराचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

हिमालयातील पूर : लेह (२०१०), केदारनाथ (२०१३), ऋषिगंगा (२०२१)

Contact Us

    Enquire Now