हिमबिबट्यांसाठीचे पहिले संरक्षण केंद्र

हिमबिबट्यांसाठीचे पहिले संरक्षण केंद्र

    • उत्तराखंडमधील भैरोंघाटी पुलाजवळील लंका या ठिकाणी भारतातील पहिले हिमबिबट्यांसाठीचे संरक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
    • UNDP आणि उत्तराखंड सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रकल्प बांधण्यात येणार आहे.
    • सहा वर्षांच्या या प्रकल्पांतर्गत हिमबिबट्यांचे संवर्धन, अधिवासाचा शाश्वत विकास यांवर लक्ष दिले जाणार आहे.
    • या प्रकल्पाद्वारे हिमबिबट्यांच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
    • उत्तराखंड राज्यात सध्या एकूण ८६ हिमबिबटे आहेत.
    • वर्ल्ड वाइल्ड फंड (WWF) अनुसार भारतात एकूण ४५०-५०० हिमबिबटे आहेत.
    • भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या परिशिष्ट – I मध्ये हिमबिबट्याचा समावेश केला आहे. त्यानुसार त्यांच्या शिकारीस आणि व्यापारास पूर्णत: बंदी आहे.
    • IUCN च्या लाल यादीनुसार हिमबिबट्यांचा समावेश ‘Vulnerable’ असा करण्यात आला आहे.

 

  • SECURE Himalayas :

 

  • Securing Livelihood, Conservation, Sustainable use and restoration of High range himalayan ecosystem – सुरुवात – २०१७
  • या प्रकल्पाद्वारे हिमालयातील जैवविविधता संरक्षित केली जाते.

Contact Us

    Enquire Now