हाफकिन बनवणार 23 कोटी लसी
- परळच्या हाफकिन बायोफार्मा कंपनीला लस बनविण्याची संमती केंद्र सरकारने दिली असून त्यासाठी अनुदानही दिले आहे.
- संपूर्ण लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी सरकारने हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स (मुंबई), इंडियन इम्युनॉलाॅजिकल्स (हैदराबाद) आणि भारत इम्युनॉलॉजिकल्स (उत्तरप्रदेश) या तीन सरकारी उद्योगांमध्ये लस बनवण्यास परवानगी दिली आहे.
- हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतर करारानुसार परळच्या हाफकिनमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन हाेईल. एका वर्षात 22.8 कोटी लसींचे उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता आहे.
- या लसनिर्मितीसाठी हाफकिन बायोफार्माला केंद्र सरकारतर्फे 65 कोटी रुपयांचे तर राज्य सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या लसनिर्मितीसाठी हाफकिनला आठ महिन्यांचा वेळ दिला आहे.
- लस उत्पादनाची प्रक्रिया दोन टप्प्यांची असते. महत्त्वाच्या औषधी भागाचे उत्पादन आणि अंतिम औषध उत्पादन. यापैकी औषध उत्पादनाची यंत्रणा हाफकिनकडे अगोदरच आहे.