हवामान अंदाजानुसार सरासरी ९८ टक्के पावसाची शक्यता
- कोरोनाच्या महामारीच्या सद्य स्थितीत सुखद वार्ता नैर्ऋत्य वाऱ्याचा ९८ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
- देशात ९८ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस होणार आहे.
- महाराष्ट्रातील पावसाचा टक्का सर्वसाधारण असून मुंबईसह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
- देशात ७५ टक्के पाऊस नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून असतो.
- मान्सूनवर परिणाम करणारा “एक निनो” तटस्थ स्थितीमध्ये आहे, व तो पुढे सरकण्याचीही शक्यता कमी आहे.
- कोरोनामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यंदा समाधानकारक पावसाचा हा अंदाज बळीराजा व भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आशेची चंदेरी कडा ठरावा असा आहे.
- १९६१ ते २०१० या कालावधीत देशात पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलीमीटर आहे.
- सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
मागील ५ वर्षातील पावसाची स्थिती
वर्ष | अंदाज | पडलेला पाऊस |
२०१६ | १०६ | ९७ |
२०१७ | ९६ | ९५ |
२०१८ | ९७ | ९१ |
२०१९ | ९६ | ११० |
२०२० | १०० | १०९ |
मान्सूनवर परिणाम करणारे घटक
- एल निनो – लहान मुलगा
-
- इक्वेडोर पेरु या दक्षिण अमेरिकन देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर काही वेळा निर्माण होणारा गरम पाण्याच्या प्रवाहांना एल निनो म्हणतात.
- पॅसिफिक महासागरात ख्रिसमसच्या दरम्यान (डिसेंबर महिन्यात) निर्माण होतो. म्हणून “ख्रिस्ताचं मुल” असेही म्हणतात.
- पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या एक निनोचा संबंध सागरी अभिकरणाशी आहे त्यास प्रारुपाला “दक्षिण हेलकावा” म्हणतात.
- पेरु व इक्वेडोरच्या किनाऱ्यावर जास्त दाब तर ऑस्ट्रेलिया इंडोनेशियाच्या भागात कमी वायूभार निर्माण होतो. त्यामुळे व्यापारी वारे वेगाने वाहतात.
- एल निनोचा परिणाम पेरुच्या किनाऱ्यावर अवर्षण दक्षिण अमेरिकेच्या विषुववृत्तीय भागात जास्त पाऊस
- याचा परिणाम भारताकडे येणारे नैर्ऋत्य मोसमी वारे कमजोर होतात व भारतात कमी पाऊस पडतो.
- ला- निना : लहान मुलगी असेही म्हणतात.
- ला – निनाची स्थिती एल निनोच्या बरोबर उलट आहे.