‘स्विच – हिट’ अन क्रिकेट
- ट्वेन्टी – २० सामन्यांमध्ये वादग्रस्त ठरवलेल्या ‘स्विच हिट’ फटक्याची चर्चा ऐरणीवर आहे. अनेक माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षकांनी ह्या फटक्याच्या खेळण्यांवर बंदी घालण्याची मागणी केली पण आधुनिक क्रिकेटनुसार हा फटका आवश्यक असल्याचेही मत असल्याने क्रिकेट विश्वात इ. गट निर्माण झाले.
- २००६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसन याने फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन विरुद्ध सर्वप्रथम हा फटका खेळला.
‘स्विच हिट म्हणजे काय’
- जेव्हा एखादा डावखुरा फलंदाज गोलंदाज चेंडू फेकण्याच्या तयारीत असताना त्वरीत उलट दिशेने फिरून उजव्या फलंदाजाप्रमाणे फटका लगावतो त्याला ‘स्विच हिट’ म्हणतात.
- याची तुलना रिव्हर्स स्वीप या फटक्याशी केली जाते पण फलंदाज रिव्हर्स स्वीपमध्ये फक्त बॅटची दिशा बदलतो व शरीरयष्टी-पाय मूळ जागेवरच असतात.
- मात्र क्रिकेट कायद्यांचे रक्षक ‘मेरिली बोन क्रिकेट क्लब (MCC) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांनी स्विच हिटला अधिकृत मान्यता दिली आहे.
- Maryle bone क्रिकेट क्लब (MCC) (स्थापना – १७८७)
- १७८८ पासून क्रिकेटच्या कायद्यांची जबाबदारी स्विकारली
- १९८९ पर्यंत MCC च्या अध्यक्ष हाच ICC चाही पदसिद्ध अध्यक्ष असे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) (स्थापना – १९०९)
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळांचे आयोजन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफ्रिकेच्या प्रतिनिधींनी १९०९ ला Imperial Cricket परिषद स्थापली.
- १९८९ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद’ हे नाव बदलण्यात आले.
- ICC मध्ये स्पर्धा आयोजित १) क्रिकेट विश्वचषक २) महिला क्रिकेट विश्वचषक ३) Champions Trophy ४) U-19 विश्वचषक ५) ICC T20 विश्वचषक