‘स्वामित्व’ योजना

‘स्वामित्व’ योजना

  • पंतप्रधान मोदींनी 11 ऑक्टोबर रोजी Survey of Villages Adabi and Mapping with Improvised Technology in Village Area (SVAMITVA) योजनेअंतर्गत गावोगाव सर्वेक्षण, घरांच्या मालकीचे  कायदेशीर कागदपत्रे, मालमत्तापत्रांचे वितरण चालू केले.
  • जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू केली.
  • या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मालमत्तेचा वापर करून कर्ज मिळवता येईल.
  • (Property Card- मालमत्तापत्र)
  • यामुळे ग्रामस्थांना विनाअडचण मालमत्तेची खरेदी-विक्री करता येईल.
  • कार्डवर मालमत्तेची माहिती, त्यावरील बँकेचे कर्ज यांची माहिती उपलब्ध असेल.)
  • हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणातील 763 गावांतील 1 लाख जणांना मालमत्तापत्रांचा लाभ देण्यात आला आहे.
  • मोबाईल वर पाठवलेल्या SMS द्वारा लाभार्थ्यांना त्यांचे मालमत्तापत्र download करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
  • पुढील 3-4 वर्षांमध्ये भारतातील सर्व खेड्यांतील जनतेला मालमत्तापत्र पुरवठ्याचे लक्ष्य आहे.
  • SVAMITVA योजनेमध्ये ड्रोनद्वारा सर्वेक्षण करून, आबादीक्षेत्रांची माहिती घेतली जाईल.
  • SVAMITVA योजना ही पंचायतराज मंत्रालय, राज्य पंचायतराज विभाग, राज्यमहसूल विभाग व सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यात संयुक्‍तपणे राबविली जाते.
  • या योजनेअंतर्गत गाव मालमत्ता, तलाव, कालवे, इत्यादी मालमत्ता पर्यवेक्षण तपासणी, भौगोलिक माहिती प्रणाली तयार करतात.
  • पंचायत राज मंत्रालय (Ministry of Panchayat Raj)

केंद्रीय मंत्री = नरेंद्रसिंग तोमर

सचिव = सुनील कुमार

 

Contact Us

    Enquire Now