स्वामित्व डॅशबोर्डचे अनावरण
- केंद्रीय पंचायतीराज व ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी स्वामित्व योजनेसंदर्भात नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर भरलेल्या एका बैठकीमध्ये १४ सप्टेंबर २०२१ ला स्वामित्व डॅशबोर्डचे अनावरण केले.
- स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसाठी सदर डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहेत.
- या डॅशबोर्डच्या माध्यमातून योजनेची जलद अंमलबजावणी तसेच इ-प्रॉपर्टी कार्डचे सुलभ वितरण शक्य होईल.
स्वामित्व योजना :
- Survey of Villages Abadi and Mapping With Improvised technology in Village Areas -SWAMITVA
- २४ एप्रिल २०२१ ला राष्ट्रीय पंचायतीराज दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली.
- उद्देश : ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जमिनींची मोजणी करणे तसेच ग्रामीण जनतेची मालकी असणाऱ्या जमिनींना कायदेशीर दर्जा देऊन त्यांना प्रॉपर्टी कार्ड (जमिनीच्या मालकीचे प्रमाणपत्र) प्रदान करणे.
- जमिनीच्या मालकीची अचूक नोंद करून तसे प्रमाणपत्र दिल्याने या योजनेअंतर्गत पुढील फायदे होतील:
- सरकारला भूमि नियोजन करणे सोपे जाईल.
- ग्रामपंचायतींना भूमिकर आकारणी सोपी जाईल.
- प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना बँकांकडून कर्ज मिळवण्यास सुलभता येईल.
- सरकारी योजनांचा लाभ देण्यास सहाय्य मिळेल.
- तसेच मालकीची अचूक नोंद होत असल्यामुळे ग्रामीण भागातील जमिनीवरून होणारे वाद कमी होण्यास मदत होईल.
- ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमिनीचे मोजमाप केल्यामुळे शासनास ग्रामीण जमिनीचा नकाशा तयार करता येईल जो विविध सरकारी विभाग वापरू शकतील.
- २०२४ पर्यंत संपूर्ण भारतभर या योजनेची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे आहे.