स्वदेशी 3D प्रिंटरचा पुणे पॅटर्न

स्वदेशी 3D प्रिंटरचा पुणे पॅटर्न-

 • देशाचा पहिला स्वदेशी थ्री-डी प्रिंटर तयार करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कंबर कसली असून त्यासाठी आवश्यक गोष्टी विकसित करण्यासाठी पुण्यात प्रगत संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे.
 • पाषाण येथील ‘सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी'(सि-  मेट) च्या आवारात ही अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात येत आहे.
 • पुढील तीन ते पाच वर्षांत पूर्णतः स्वदेशी बनावटीचे थ्री-डी प्रिंटर बाजारात आणण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.
 • केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी सि-मेट ची प्रयोग शाळा आणि भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स (सीआयपीईटी) या संस्था यासंबंधीचे संशोधन करणार आहेत.
 • या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे उद्योगांनाही तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध होईल व परकीय गंगाजळी वाचेल आणि इतर आवश्यक साहित्याच्या बाजारपेठेला चालना मिळेल.
 • थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान- एडीटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग (एएम) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पदार्थाची त्रिमितीय रचना साकारल्या जातात. ज्यामध्ये संगणकाच्या माध्यमातून द्रवपदार्थाच्या कणांना एकत्र करून विशिष्ट रचना अथवा वस्तू साकारली जाते. एक प्रकारे कागदावरील प्रिंटिंग ऐवजी वस्तूचे त्रिमितीय प्रिंटिंग केली जाते.
 • थ्री-डी प्रिंटिंगची आवश्यकता-
 1. इलेक्ट्रॉनिक्स वैद्यकीय संशोधन ज्वेलरी वाहन उद्योग संरक्षण आदीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर.
 2. अतिशय कमी किमतीत जास्त वस्तूचे उत्पादन.
 3. गुंतागुंतीची, क्लिष्ट आणि नाजूक वस्तू अथवा विशिष्ट भागाची निर्मिती करता येते.
 4. सध्या चीन, अमेरिका आणि जर्मनी मधून थ्री-डी प्रिंटर आणि पदार्थाची आयात होते.

Contact Us

  Enquire Now