स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे पहिले यशस्वी सागरी परीक्षण
- स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेने पहिले सागरी परीक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
- ४ ऑगस्ट २०२१ रोजी कोची (केरळ) येथून या युद्धनौकेच्या सागरी परीक्षणास सुरुवात झाली जे ८ ऑगस्ट २०२१ रोजी पूर्ण झाले.
- या परीक्षणादरम्यान विक्रांत नौकेवरील दिशादर्शक यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि मुख्य सांगाड्यातील साधने यांच्या परीक्षणासोबतच नौकेला पाण्यावर प्रवास करण्यासाठी आवश्यक यंत्रणेचीदेखील कठोर चाचणी केली गेली.
आयएनएस विक्रांतचे वैशिष्ट्ये:
- रचना : भारतीय नौदलाचे नौदल रचना संचालनालय
- बांधणी : कोचीन शिपयार्ड लिमिटेड
- आकार : २६२ मी.. लांबी, ६२ मी. रुंदी, ५९ मी. उंची
- वजन : ४०००० टन
- पाच सुपरस्ट्रक्चर्स असलेले १४ डेक
- २३०० पेक्षा अधिक कंपार्टमेंट्स जे सुमारे १७०० लोकांच्या समुद्र पर्यटनासाठी निर्माण केले आहेत. त्यात महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सोय आहे.
- मशीनरी ऑपरेशन, जहाज नॅव्हिगेशन आणि टिकाऊपणासाठी उच्च पातळीचे ऑटोमेशन असलेल्या जहाज रचनेत निश्चित विंग आणि रोटरी विमान वर्गीकरणासाठी जागा आहेत.
- ही विमानवाहू युद्धनौका म्हणजे एक तरंगते शहर असून विमानांच्या परिचलनासाठी असलेल्या तळाचे क्षेत्रफळ दोन फूटबॉल मैदानांच्या एकत्र क्षेत्रफळाइतके आहे.
- ७६ टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीसह तयार केलेले आयएसी हे राष्ट्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांचे उत्तम उदाहरण आहे.
- ऑगस्ट २०१३ मध्ये कोचीन शिपयार्डच्या बांधणी गोदामात स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकांच्या बांधणीची सुरुवात झाल्यामुळे भारताने विमानवाहू जहाजांची बांधणी व रचना करणाऱ्या देशांच्या गटात प्रवेश केला आहे.
- सर्व चाचण्यांती भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यादिनी म्हणजे ‘आझादी का अमृत महोत्सव प्रसंगी’ विक्रांतचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे.
- भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी कार्यक्रमांतर्गत आर्थिक उत्तेजनासाठी ४४ जहाजे आणि पाणबुड्या स्वदेशात तयार केल्या जात आहेत.