स्वदेशी बनावटीच्या प्रलय क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी

स्वदेशी बनावटीच्या प्रलय क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) २२ डिसेंबर २०२१ रोजी स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • ओदिशाच्या तटवर्ती भागावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली.

प्रलय क्षेपणास्त्राविषयी ठळक मुद्दे

१) स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० ते ५०० किमी असून मोबाईल लाँचद्वारे ते सोडता येईल.

२) ५०० ते १००० किलोची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता यात आहे.

३) क्षेपणास्त्राला मार्गदर्शन करणाऱ्या प्रणालीत अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली तसेच विमान तंत्रज्ञानही समाविष्ट आहे.

इतर वैशिष्ट्ये

  • घनइंधनाचा वापर
  • पृथ्वी संरक्षण वाहनावर आधारित
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे निम बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
  • पाठलाग करणाऱ्या क्षेपणास्त्राला गुंगारा देण्यास सक्षम
  • हवेत काही अंतर कापल्यानंतर मार्ग बदलण्याची क्षमता

पार्श्वभूमी :

  • २०११ मध्ये प्रथमच चाचणी झालेल्या प्रहार क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे सहायक उत्पादन आहे.
  • प्रहार हे १५० किमीपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
  • अनगाइडेड पिनाक मल्टि-बॅरेल रॉकेट लाँचर आणि गाइडेड पृथ्वी क्षेपणास्त्र या प्रकारांतील अंतर कमी करणे हा मुख्य उद्देश आहे.

महत्त्व :

  • हे युद्धक्षेत्रातील सामरिक गतिशीलता पूर्णपणे बदलण्यास सक्षम असून यामुळे भारताकडे लांब पल्ल्याची दोन पारंपरिक क्षेपणास्त्रे असतील.
  • ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (>२९० किमी) व प्रलय हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा पर्याय भारताकडे आहे.

बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रातील फरक

क्र.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

क्रूझ क्षेपणास्त्र

१) प्रक्षेपण गती आणि प्रवास हा गुरुत्वाकर्षण, हवेचा प्रतिकार व कोरिओलिस बलावर अवलंबून असतो. तुलनेने गतीच्या सरळ मार्गाचे अनुसरण करते.
२) लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे (३००-१२००० किमी) कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे (१००० किमीपर्यंतची श्रेणी)
३) उदा. पृथ्वी – I, पृथ्वी -II, अग्नी-I, अग्नी-II, धनुष, इ. उदा. ब्राह्मोस इ.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now