स्वच्छ सर्वेक्षण २०२०
- २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन-शहरी सुरू झाल्यापासून या मोहिमेने स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे.
- स्वच्छ सर्वेक्षण २०२० या सर्वेक्षण अहवालाचे स्वच्छ सर्वेक्षण अहवाल नवनिर्मिती आणि सर्वोत्तम पद्धतीविषयी अहवाल, स्वच्छ सर्वेक्षण समाजमाध्यम अहवाल आणि गंगा शहरे मूल्यांंकन अहवाल या अहवालासोबत प्रकाशन करण्यात आले.
- स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान इंदूरने पटकावला आहे. इंदूरने सलग चौथ्यांदा हा बहुमान पटकावला आहे. या स्पर्धेत सुरत शहराने दुसरा तर नवी मुंबई शहराने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
- १०० पेक्षा जास्त शहरी स्थानिक संस्थांच्या श्रेणीत छत्तीसगढ सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आले तर १०० पेक्षा कमी शहरी स्थानिक संस्थांच्या श्रेणीत झारखंड राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळी एकूण १२९ पुरस्कार प्रदान करण्यात आले.