स्वच्छ सर्वेक्षण २०२०
- केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाजमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी २० ऑगस्ट २०२० रोजी स्वच्छ सर्वेक्षण सर्व्हेची पाचवी आवृत्ती जाहीर केली.
- यामध्ये एकूण १२९ पुरस्कार जाहीर केले.
- मध्यप्रदेश राज्यातील इंदौर शहराने सलग चौथ्या वेळेस देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला आहे.
- पहिल्या तीन शहरांत सुरत (गुजरात) व नवी मुंबई (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
- हा सर्व्हे तब्बल २८ दिवस चालला, हा जगातील सर्वात मोठा स्वच्छ सर्व्हे ठरला.
- क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेद्वारे सर्वेक्षण घेण्यात आले.
काही महत्त्वाचे पुरस्कार
१०० पेक्षा कमी नागरी स्थानिक संस्था असणारी स्वच्छ राज्ये.
१. झारखंड, २. हरियाणा, ३. उत्तराखंड
१०० पेक्षा जास्त नागरी स्थानिक संस्था असणारी स्वच्छ राज्ये
१. छत्तीसगढ, २. महाराष्ट्र, ३. मध्यप्रदेश
सर्वात स्वच्छ शहरे
१० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी स्वच्छ शहरे
१. इंदौर – (मध्यप्रदेश), २. सुरत – (गुजरात),
३. नवी मुंबई (महाराष्ट्र)
१० लाख पेक्षा कमी लोकसंख्या असणारी स्वच्छ शहरे
१. अंबिकापूर (छत्तीसगढ), २. म्हैसूर (कर्नाटक),
३. नवी दिल्ली (दिल्ली)
काही महत्त्वाचे :
पहिल्या २० स्वच्छ महानगरांत महाराष्ट्रातील ५ शहरे
- महाराष्ट्रातील शहरे – नवी मुंबई (३), नाशिक (११), ठाणे (१४), पुणे (१५), नागपूर (१८), कल्याण डोंबिवली (२२), पिंपरी चिंचवड (२४), औरंगाबाद (२६)
- सर्वेक्षणात राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले.
- कराड शहर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत देशात प्रथम.
- जालंधर – सर्वात स्वच्छ कटक मंडळ
- नवी दिल्ली – सर्वात स्वच्छ राजधानी
- वाराणसी – सर्वात स्वच्छ गंगा टाऊन
स्वच्छ सर्वेक्षणविषयी :
- २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले.
- या अभियानाच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी २०१६ मध्ये पहिला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- हे सर्वेक्षण गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाअंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे केले जाते.