स्पुटनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी
- रशियाने स्पुटनिक लाइट ही नवी कोरोना लस बनवली असून तिच्या आपत्कालीन वापरास पुतीन सरकारने मान्यता दिली आहे.
- स्पुटनिक लाइट लस एका डोसची असून ती ८० टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे.
- रशियाने याआधी बनविलेली स्पुटनिक व्ही लस भारतातील लसीकरण मोहिमेमध्ये आता वापरण्यात येणार आहे.
- जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहेत. स्पुटनिक लाइट ही स्पुटनिक व्ही पेक्षा जास्त प्रभावी आहे.
- स्पुटनिक व्हीचे दोन डोस घेतल्यानंतर ती लस कोरोनावर ९१.६ टक्के प्रभावी ठरते. मात्र स्पुटनिक लाइटचा एकच डोस घेतल्यानंतर ही लस ७९.४ टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे.
- स्पुटनिक लाइट लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी अँटिबॉडी विकसित होतात. ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत रशियाने व्यापक लसीकरण मोहीम राबवली. त्यामध्ये स्पुटनिक लाइट लस रशियातील नागरिकांना देण्यात आली.