स्पर्धापरीक्षांच्या नव्या तारखा जाहीर-
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी 2020 मधील रखडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केले आहेत.
- 1) 14 मार्च- राज्यसेवा पूर्व परीक्षा.
- 2) 27 मार्च- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा.
- 3) 11 एप्रिल- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा.
- कोरोना संसर्गामुळे या परीक्षांच्या वेळापत्रकात व नियोजनात वेळोवेळी बदल करावा लागला आहे.
- सप्टेंबर मध्ये सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे संघटनांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती.
- जवळपास 1223 पदांसाठी सुमारे 8 लाख उमेदवारांनी या परीक्षांसाठी नोंदणी केली आहे.
- वेळोवेळी परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने व तारीख जाहीर होत नसल्याने उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेला या नवीन वेळापत्रकाने दिलासा मिळाला आहे.