स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन अहवाल
- संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी (UNFPA) यांच्या State of World Population,२०२०: Against my will-Defying the practices that harm women and girls and undermine equality अहवालानुसार भारतात गेल्या पन्नास वर्षांत ४५.८ दशलक्ष महिला गहाळ झाल्या आहेत.
- लैंगिक भेदभावामुळे ज्या मुलींना गर्भपात किंवा जन्मानंतर जीव गमवावा लागतो त्या मुलींची संख्या ‘गहाळ महिला’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघटना ठरवते.
अहवालातील निरीक्षणे :
१) गेल्या पन्नास वर्षांत गहाळ महिलांच्या संख्येत दुपटीपेक्षा जास्तीने वाढ झालेली आहे. (१९७० – ६.१ कोटी, २०२०- १४.६ कोटी)
२) २०१३ ते २०१७ या काळात भारतात दरवर्षी ४,६०,००० मुली जन्माला आल्यानंतर मृत्यू पावल्या आहेत, असे हा अहवाल म्हणतो.
३) एकूण गहाळ महिलांमधील ९०-९५% अर्भके व शिशु चीन आणि भारतात आहेत.
४) गेल्या ५० वर्षांत चीनमध्ये सर्वांत अधिक ७२.३ मिलियन गहाळ महिला नोंदवण्यात आल्या आहेत.
५) भारतात प्रत्येकी मुलींच्या प्रत्येकी १००० मृत्यूंमागे १३.५% म्हणजेच दर नवातील एका मुलीचा मृत्यू वयवर्षे पाच अगोदर लिंगभेद, लिंगनिवड यामुळे होतो.
६) लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या २०५० पर्यंत भारतात वय वर्ष ५० पर्यंत लग्न न करता एकटे राहणार्या पुरुषांची संख्या १०% ने वाढण्याचा अंदाज या अहवालात वर्तवलेला आहे.
UNFPA बद्दल :
- मुख्यालय : न्यूयॉर्क
- एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर : डॉ. नातालिया कानेम