स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आता देशातील आठ भागातून रेल्वे धावणार
- भारतीय रेल्वेने आता गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याला म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटीला’ जागतिक स्तरावरील पर्यटनाशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
- व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे देशभरातील पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी या रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच ब्रॉडग्रेज मार्गाचेही उद्घाटन करण्यात आले आहे.
- अहमदाबाद, दादर (मुंबई), वाराणसी, हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली), प्रतापनगर (बडोदा), रेवा आणि चेन्नई येथून केवडियासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेचे डबे व्हिस्टाडोम प्रकारातील असल्यामुळे निसर्ग सौंदर्याचा आनंद प्रवासी घेऊ शकतील.
- दाभोई, केवडिया आणि चणोद या तीन रेल्वे स्थानकांचे तसेच दाभोई-चंदोद ब्रॉड गेज, चंदोद-केवडिया ब्रॉड गेज, विद्युतीकरण झालेला प्रतापनगर-केवडिया मार्ग यांचेही उद्घाटन करण्यात आले.
- एकाच वेळी एकाच ठिकाणी देशाच्या विविध भागातून आठ रेल्वेसेवा सुरू करणे हे ऐतिहासिक आहे. ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ चा मंत्र देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच असलेल्या पुतळ्याचे दर्शन पर्यटकांना घेता येणार आहे. रेल्वेच्या या जोडणीमुळे आदिवासी समाजाचे जीवन बदलण्यास सुरुवात होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
- केवडियामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. इकॉनॉमी आणि इकॉलॉजी यांचा उत्तम मेळ घालून केवडियाचा झालेला विकास हे उत्तम उदाहरण असेल.
- २०१८ पासून जवळपास ५० लाख पर्यटकांनी पुतळ्याला भेट दिली. या बाबतीत अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ काही मागे टाकले आहे, असे मोदी म्हणाले.
सरदार वल्लभभाई पटेल
- जन्म – ३१ ऑक्टोबर १८७५ (नडियाद, गुजरात)
- मृत्यू – १५ डिसेंबर १९५० (मुंबई)
- भारताचे पहिले उपपंतप्रधान – १५ ऑगस्ट १९४७ ते १५ डिसेंबर १९५० मरणोत्तर भारत रत्न १९९१
स्टॅच्यू ऑफ युनिटी
- जगातील सर्वात उंच पुतळा – १८२ मी. (५९७ फूट)
- एकूण उंची – २४० मी.
- पाया (Base) – ५८ मी.
- नदी – नर्मदा (साधू बेट)
- शिल्पकार – राम सुतार
- स्टील, सिमेंट आणि ब्रॉन्झ यापासून पुतळा उभारण्यात आला.