स्टार्स प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून भारताला ५०० दशलक्ष डॉलर

स्टार्स प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून भारताला ५०० दशलक्ष डॉलर

  • भारतातील सहा राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘स्टार्स’ (Strengthening Teaching-Learning and Results for States Program) या कार्यक्रमासाठी जागतिक बँकेकडून ५०० मिलियन डॉलर्स मिळणार आहेत. हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थान या राज्यात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.
  • स्टार्स कार्यक्रम समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबवला जाणार आहे. भारतात वय ६ ते १७ या वयोगटातील २५ कोटी विद्यार्थी १५ लाख शाळांमधून शिक्षण घेत आहेत. १ कोटी शिक्षक या शाळांत शिकवत आहेत. त्यांना या कार्यक्रमांतर्गत लाभ होणार आहे.
  • योग्य शैक्षणिक मूल्यांकन पद्धती, वर्गातील शिकवण्याच्या नव्या पद्धती, विकेंद्रित व्यवस्थापन आणि सक्षम शासकता यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. हा कार्यक्रम सकारात्मक शैक्षणिक परिणाम साधण्यासाठी आहे.
  • जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार भारताने २००४-०५ ते २०१८-१९ या काळात शिक्षण सर्वांपर्यंत पोचवण्यात महत्त्वाचे काम केले आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण २१.९ कोटींवरून २४.८ कोटींवर गेले आहे.

Contact Us

    Enquire Now