स्टडी इन इंडिया कार्यक्रमाची इंड-सॅट टेस्ट २०२०

स्टडी इन इंडिया कार्यक्रमाची इंड-सॅट टेस्ट २०२० 

  • मानव संसाधन व विकास मंत्रालयाने (MHRD) २२ जुलै, २०२० रोजी स्टडी इन इंडिया कार्यक्रमानुसार पहिली भारतीय शिष्य मूल्यांकन (इंडसॅट) चाचणी २०२० आयोजित केली. 
  • राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे परीक्षित इंटरनेट पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली.
  • इंड-एसएटी परीक्षा परदेशी विद्यार्थ्यांसाठी निवडक भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्ती देण्याकरिता आहे. 
  • नेपाळ, इथिओपिया, बांगलादेश, भूतान, युगांडा, टांझानिया, रवांडा, श्रीलंका, केनिया, झांबिया, इंडोनेशिया आणि मॉरिशसमधील जवळपास पाच हजार उमेदवारांनी परीक्षेला हजेरी लावली होती.
  • स्टडी इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत स्नातक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम अशा दोन्ही शिष्यवृत्तींच्या वाटपासाठी केलेल्या गुणांनुसार विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल.
  • ‘स्टडी इन इंडिया’ कार्यक्रम ः भारताला आकर्षक शैक्षणिक गंतव्यस्थान म्हणून परदेशी विद्यार्थ्यांचे आकर्षण स्थान बनविणे, हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

Contact Us

    Enquire Now