सौभाग्य योजनेची 4 वर्षे

सौभाग्य योजनेची 4 वर्षे

 • वीजजोडणी नसलेल्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना (दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील दोन्हीही) आणि शहरी भागातील गरीब (दारिद्र्यरेषेखालील) कुटुंबांना मोफत वीजजोडणी पुरविण्यासाठी सौभाग्य योजना सुरू करण्यात आली.

योजनेचे नाव – सौभाग्य (Soubhaghya) योजना 

PMSBHGY – प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना

 • सुरुवात – 25 सप्टेंबर 2017
 • वीजजोडणी नसलेल्या निवडलेल्या कुटुंबांच्या घराला मोफत वीज जोडणी देणे.
 • कुटुंब निवडण्यासाठी SECC (Social Economical Caste Census) 2011ची मदत घेतली जाईल.
 • तसेच SECC-2011 मध्ये नोंद नसलेल्यांना 500 रु. आकारण्यात येतील. ही रक्कम पुढील 10 वीजबिलांत विभागून वसूल केली जाते.
 • वीजजोडणी नसलेल्या दुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबांना 300 वॅट ऊर्जाक्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा पुरवण्यात येते.
 • लक्ष्य – 31 डिसेंबर 2018 (4 कोटी कुटुंबांना वीज जोडणी पुरवणे.)
 • लक्ष्य साध्य करण्यात अपयश.
 • त्यामुळे 1 जानेवारी 2021 असे पुनर्रचित लक्ष्य. मात्र 1 जानेवारी 2021 पर्यंत 2.81 कोटी कुटुंबांनाच वीजजोडणी पुरवण्यात आली.

महत्त्वाचे 

4 एप्रिल, 2005 – राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY)

 • एक लाख गावांमध्ये आणि एक कोटी घरांमध्ये वीज पोहोचविणे.

2006 – राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण धोरण

 • 2009 पर्यंत सर्व ग्रामीण कुटुंबांपर्यंत वीज पोहोचवणे.

25 जुलै 2015 – दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना (DDU-GJY)

 • 100 टक्के खेड्यांना वीज.
 • कार्यक्षेत्र – फक्त ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब.
 • 28 एप्रिल 2018 मध्ये 100% खेडी वीजजोडणीयुक्त हे लक्ष्य साध्य.
 • 100 टक्के खेडी वीजमुक्त जरी झाली असली तरी सर्व कुटुंबांना आर्थिक वा इतर कारणांनी वीजजोडी घेता आली नव्हती. यावर उपाय म्हणून 25 सप्टेंबर 2017 रोजी मोफत वीजजोडणीसाठी सौभाग्य योजना सुरू करण्यात आली.

Contact Us

  Enquire Now