
सौदीच्या सीमा कतारसाठी खुल्या
- सौदी अरेबियाने कतारसाठी आपली भू आणि हवाई हद्द खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यानंतर लगेचच कतारचे अमीर शेख तमिम बिन हमाद अल यांनी हे सौदी अरेबियात दाखल झाले.
- काही वर्षांपासून या दोन देशांमधील राजनैतिक वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- कतार आणि सौदी अरेबियामध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी कुवेत आणि अमेरिका सातत्याने प्रयत्न करीत होते.
- त्याला अखेर यश येऊन आखाती देशांमधील अरब नेत्यांच्या परिषदेच्या आणि अमेरिकेत नव्या अध्यक्षांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक घडामोड झाली आहे.
- अरब देशांमधील तसेच, आखाती देश आणि इस्रायलमधील वाद मिटविण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे.