सोया मीलला जीवनावश्यक वस्तू म्हणून घोषित
- सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत ३० जून २०२२ पर्यंत ‘सोया मील’ हे जीवनावश्यक वस्तू म्हणून घोषित केले आहे.
गरज
१) सोया पेंडच्या किंमती वाढण्याची क्षमता असलेल्या बाजारातील अन्यायकारक कृतींना (साठेबाजी, काळाबाजार) आळा बसेल परिणामी सोयाबीन तेलाचे बाजारभाव कमी व्हायला मदत होईल.
२) पोल्ट्री फार्म आणि पशुखाद्य यांना वस्तूंची सहज उपलब्धता
सोयाबीन पेंडविषयी
- सोयाबीन पेंड हा सर्वात महत्त्वाचा प्रथिन स्रोत असून शेतातील जनावरांना खाद्य म्हणून याचा मुख्यत्वे वापर केला जातो.
- काही देशांत मानवी व्यापारासाठीही याचा वापर केला जातो.
- प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांत सोयाबीन पेंडचा एकूण जागतिक उत्पादनांपैकी सुमारे दोन तृतीयांश वाटा आहे.
- सोयाबीन पेंड हे सोयाबीन तेलाचे पुरक उत्पादन (by product) आहे.
सोया मील साठवणुकीवरील मर्यादा
अ) संयंत्रे/मिलर/प्रक्रियाकर्ते
- उपरोक्त सर्वांच्या प्रतिदिन उत्पादन क्षमतेनुसार जास्तीत जास्त ९० दिवस साठवणूक त्याचबरोबर साठवणुकीची जागा जाहीर करणे बंधनकारक
ब) व्यापारी कंपनी / व्यापारी / खासगी चौपाल
- केवळ सरकारमध्ये नोंदणीकृत असलेले उद्योग, जाहीर केलेल्या आणि ठराविक ठिकाणी जास्तीत जास्त १६० मेट्रिक टन साठवणूक करू शकतील.
- मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक केल्यास अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर तपशील जाहीर करून ३० दिवसांच्या आत साठवणुकीचे प्रमाण विहित मर्यादेपर्यंत आणावे लागेल.
अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५:
- जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन, वितरण, व्यापार व वाणिज्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला या कायद्यानुसार आदेश काढता येतात.
- जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केंद्र सरकारने १२ फेब्रुवारी २००७ रोजी सुधारणा केली होती, त्यानुसार त्यात समाविष्ट घटक-
- औषधे, खते (रासायनिक, अकार्बनी किंवा मिश्र), अन्नसामग्री खाद्यतेल, बिया व तेल यांच्यासह), पूर्णतः कापसापासून तयार केलेला धागा, पेट्रोलियम व पेट्रोलजन्य पदार्थ, कच्चा ताग व तागाचे कापड, गुरांच्या वैरणाचे बियाणे, तागाचे बियाणे, सरकी, अन्न पिकांचे बियाणे तण आणि फळे भाजीपाल्याचे तण इ.
लडाखमध्ये लोसर उत्सव साजरा
- तिबेटी बौद्ध धर्माच्या चंद्र दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणून १५ दिवसांच्या लोसर उत्सव साजरा केला जातो.
- लडाखमधील बौद्ध समुदाय हा सण विविध नृत्य, संगीत कलांचे सादरीकरण करून मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
- भारतात हा उत्सव देशाच्या विविध भागात राहणाऱ्या योल्मो, शेर्पा, तमांग, गुरंग आणि भूतिया या समुदायाद्वारा साजरा केला जातो.
- लोसर या तिबेटी शब्दाचा अर्थ ‘नवीन वर्ष’ असा होतो.
- तिबेट, नेपाळ आणि भूतानचा सर्वात महत्त्वपूर्ण बौद्ध उत्सव आहे.
- १७व्या शतकाच्या सुरुवातीला तिबेटचा नववा राजा जामयांग नामग्यालने हिवाळ्यात युद्धाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी लोसर उत्सव साजरा केला होता.
- तेव्हापासून तिबेटी कॅलेंडरच्या ११व्या महिन्यात हा सण साजरा केला जातो.
- या सणाची सुरुवात धार्मिक स्थळे व घरांवर रोषणाई करून केली जाते.
- संध्याकाळच्या वेळी, रस्ते, गल्ली तसेच बाजारपेठांत ज्वलंत मशाल घेऊन मिरवणूक काढली जाते त्याला मेथो (METHO) असे म्हणतात.
- नेपाळमध्ये या सणाला ‘ल्योच्छार’ असे म्हणतात.
- या सणादरम्यान पारंपरिक गुंपा नृत्याचे सादरीकरण केले जाते.
ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण
क्र. | उत्सव | राज्य |
१ | बिहू | आसाम |
२ | हॉर्नबिल, ऑलिंग | नागालँड |
३ | वांगला, नोंगक्रेम | मेघालय |
४ | झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक, मायोको, लोसर, द्री फेस्टिव्हल | अरुणाचल प्रदेश |
५ | लॉसॉन्ग, सागा दावा | सिक्कीम |
६ | खार्ची पूजा | त्रिपुरा |
७ | चैरोबा, लाय हरोबा | मणिपूर |
८ | चापचर कूट | मिझोराम |