सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 • विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढी घडविणारे, शिक्षणात गुणात्मक बदल करणारे, लडाखमधील शिक्षकतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

सोनम वांगचुक यांच्याविषयीर :

 • सोनम वांगचुक यांचा जन्म १ सप्टेंबर १९६६ रोजी उलेतोकापो, जम्मू काश्मिरमध्ये झाला.
 • सोनम वांगचुक हे लडाखमधील एक अभियंता आणि शिक्षण सुधारक आहेत. यांना लडाखच्या शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक समजले जाते. सौर उर्जेवर चालणार्‍या SECMPOL कॅम्पसची रचना करण्यासाठी ते ओळखले जातात. ते स्वयंपाकासाठी, प्रकाशासाठी किंवा उष्णतेेसाठी कोणतेही जीवाश्म इंधन वापरत नाहीत.
 • वांगचुक यांना २०१६ चा ‘रोलेक्स अ‍ॅवॉर्ड फॉर इंटरप्राईज’, लॉस एंजेल्स येथे देण्यात आला होता. जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार यापूर्वी फक्त १४० जणांना मिळाला आहे.
 • १९९४ मध्ये ऑपरेशन न्यू होपच्या सहाय्याने वांगचुक यांनी शासकीय व ग्रामीण समुदायांचा सहयोग घडवून आणला. त्यांनी बर्फ स्टुपा तंत्रज्ञानाचा शोध लावला. कृत्रिम ग्लेशियर्स तयार केले. त्यामध्ये शंकूच्या आकाराची बर्फाची बांधणी हिवाळ्यात पाणी साठविण्यासाठी वापरली जाते.
 • जे शिक्षणात गतिशील असून त्यांना परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेणे शक्य होत नाही किंवा गरीब परिस्थितीमुळे अपेक्षित क्षेत्रात जाणे शक्य होत नाही, अशा मुलांसाठी वांगचुक काम करतात. 
 • त्यासाठी त्यांनी १९८८ साली एका संस्थेची स्थापना केली. शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात ते काम करत आहेत. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी या कामाला पूर्णपणे वाहून घेतले आहे. त्यांनी यासाठी एज्युकेशनल अ‍ॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) या नावाची संघटना स्थापन केली.
 • जम्मू-काश्मिर सरकारबरोबर त्यांनी लडाखच्या शाळांमधील अभ्यासक्रम स्थानिक भाषेत तयार करण्याचे कार्य हाती घेतले. १९९४ मध्ये त्यांनी शाळेतून काढून टाकण्यात आलेल्या १००० तरुणांची संघटना तयार केली आणि त्यांच्या मदतीने एक अशी शाळा काढली जी विद्यार्थ्यांमार्फतच चालवली जाते. या शाळेत पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर केला जातो.
 • लडाख सीमेवरील अलिकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादन निर्मितीसाठी भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा नारा दिला जात असताना वांगचुक यांनी स्वदेशीचा पुरस्कार हेच चीनच्या आव्हानाला खरे उत्तर ठरेल अशी ठाम भूमिका मांडली.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराविषयी:

 • स्वरूप : एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र
 • पुरस्काराचे ३७ वे वर्ष
 • लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिरामध्ये होणार्‍या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार होते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे त्यादिवशी कार्यक्रम झाला नाही.
 • यावर्षीचा पुरस्कार : सोनम वांगचुक यांना जाहीर (शिक्षण व संशोधन क्षेत्र)

Contact Us

  Enquire Now