
सुरिनामच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे चंद्रिकाप्रसाद
- सुरिनाम देशाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे चंद्रिकाप्रसाद ऊर्फ चन संतोखी यांची निवड झाली आहे.
- संतोखी यांनी सार्वत्रिक निवडणुकीत देशाचे हुकुमशहा देसी बुटर्स यांचा पराभव केला. ६१ वर्षीय संतोखी आता बुटर्स यांची जागा घेतील. संतोखी हे या देशाचे पोलिस प्रमुख होते. २००५ पूर्वी त्यांनी कायदामंत्री म्हणूनही काम केले आहे.
- सुरिनाम हा देश दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनारपट्टीवर वसलेला आहे. या देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पक्षाने एकतर्फी विजय मिळवला आहे. या देशात २७ टक्के भारतीय लोक राहतात.