सुरक्षित संदेवहनासाठी लष्करातर्फे स्वतंत्र ॲपची निर्मिती
- लष्करी सेवेत असलेल्या जवान आणि अधिकाऱ्यांसाठी संदेशवहनाचा (मेसेजिंग) एक सुरक्षित पर्याय म्हणून नवीन ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.
- SAI – ’सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट’ असे याचे नामकरण करण्यात आले असून कर्नल साई शंकर यांनी ते विकसित केले आहे.
- ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.
- इंटरनेटचा वापर करून ॲण्ड्रॉइड प्रकारच्या फोनमध्ये त्याचा वापर करणे शक्य होणार आहे.
- लवकरच IOS कार्यप्रणाली वापरणाऱ्या फोनसाठीही हे ‘ॲप’ वापरता यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- सध्या वापरले जात असलेल्या व्हॉट्स्ॲप, टेलिग्राम, संवाद आणि GIMS यांसारख्या व्यावसायिक ॲपप्रमाणेच सुरक्षेची खबरदारी या ॲपमध्येही घेण्यात आली आहे.
- त्यामुळे लष्करी सेवेतील अधिकारी आणि जवान SAI ॲपचा वापर करू शकणार आहेत.
ॲपबद्दल :
- हे ॲप इंटरनेवरून ॲण्ड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी शेवटपर्यंत सुरक्षित व्हॉईस, मेसेज आणि व्हिडिओ कॉलिंग समर्थन देते.
- सेवेत सुरक्षित मेसेजिंग सुलभ करण्यासाठी SAI-पॅन आर्मीचा वापर केला जाईल.
- एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर या ॲपमध्ये केला आहे.
- सीईआरटी-इन एम्पेनलेड ऑडिटर आणि आर्मी सायबर ग्रुप यांनी या अर्जाची तपासणी केली आहे.