सुप्रीम कोर्टाच्या ‘वन मॅन पॅनेल’वर माजी न्यायाधीश मदन लोकूर यांची नियुक्‍ती

सुप्रीम कोर्टाच्या ‘वन मॅन पॅनेल’वर माजी न्यायाधीश मदन लोकूर यांची नियुक्‍ती

 • 16 ऑक्‍टोबर 2020 रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पिकांचे खुंट जाळण्याचे रोखणे व त्यावर देखरेख करण्यासाठी एक सदस्यीय समिती तयार करण्याचे निर्देश दिले. 
 • त्या समितीवर माजी न्यायाधीश, मदन भीमराव लोकूर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
 • पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी हिवाळ्यात पिकांचे खुंट जाळल्याने राजधानी दिल्लीतील हवामान बिघडून हवेची गुणवत्ता घसरली आहे.
 • खंडपीठाने पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) प्राधिकरण (EPCA) व दिल्ली आणि 3 राज्यांच्या मुख्य सचिवांना न्या. लोकूर पॅनेलला पेंढा जाळण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्‍त मार्ग व उपाययोजना करण्यास मदत करण्याचे निर्देश दिले.
 • आदित्य दुबे यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषण पातळीवरून दाखल केलेल्या याचिकेवरून या पॅनेलची स्थापना केली आहे.
 • समिती आपला पाक्षिक अहवाल प्रारंभीच किंवा गरज भासेल तसे सुप्रीम कोर्टा समोर सादर करेल.
 • मदन लोकूर यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये पेंढा जाळण्यावरून होणाऱ्या प्रदूषणासंबंधी बाबींचा निपटारा केला होता.

Stubble burning (खुंट/पेंढा जाळणे)

 • पुढील पीक पेरण्यासाठी आधीच्या पिकांच्या अवशेषांना आग लावणे.
 • पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश मध्ये मुख्यत: सप्‍टेंबर-ऑक्‍टोबर काळात शेतकरी हिवाळ्यातील रब्बी पिकांच्या लागवडीसाठी खूप कमी कालावधी उरल्याने या मार्गाचा अवलंब करतात.
 • पेंढामुक्‍त होण्याचा हा सर्वात स्वस्त व वेगवान उपाय आहे.

Contact Us

  Enquire Now