सीपीटीपीपीमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटन अर्ज करणार
- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लवकरच ब्रिटन सीपीटीपीपी (कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप) मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करणार असल्याचे म्हटले आहे. ब्रेक्झिटपश्चात नव्या भागीदारी करून व्यापार आणि अर्थव्यवस्था यांना चालना देणे हा या निर्णयामागील हेतू आहे.
काय आहे सीपीटीपीपी?
- बराक ओबामा यांच्या कार्यकाळात टीपीपी (ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप) करार प्रत्यक्षात आला, ज्यामध्ये अमेरिकेसह एकूण बारा देश होते. चीनच्या वाढत्या आर्थिक प्रभुत्वावर लगाम लावणे हा या भागीदारीचा उद्देश होता, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून २०१७ साली माघार घेतली.
- अमेरिकेच्या माघारीनंतर उरलेल्या अकरा देशांनी हा करार पुढे नेला आणि यावर २०१८ साली सह्या करण्यात आल्या.
- सीपीटीपीपीमधील अकरा देश पुढीलप्रमाणे – ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर आणि व्हिएतनाम.
- १३.५ ट्रिलियन डॉलर्सच्या एकत्रित जीडीपीनुसार सीपीटीपीपी हा नाफ्ता, युरोपियन युनियन आणि आरसीईपी नंतर जगातला चौथा सर्वात मोठा करार आहे.