सिरम इन्स्टिट्यूट आणि युनिसेफमध्ये करार

सिरम इन्स्टिट्यूट आणि युनिसेफमध्ये करार

  • लस निर्मिती क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि युनिसेफमध्ये न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सिन (PCV) या न्यूमोनियावरील लसीच्या अल्प उत्पन्न गटातील देशांना पुरवठा करण्याबाबतचा करार करण्यात आला.
  • ‘न्यूमोकोकस बॅक्टरियम’मुळे न्यूमोनिया हा आजार होतो. दोन वर्षांखालील बालकांना न्यूमोनियाचा सर्वाधिक धोका असतो. न्यूमोनियामुळे प्रत्येक ३९ सेकंदाने एका बालकाचा मृत्यू होतो. सर्वाधिक मृत्यू अल्प उत्पन्न गटातील देशात होतात.
  • या करारांतर्गत सिरम इन्स्टिट्यूट पुढील १० वर्षांत २ डॉलर प्रति लस दराने १ कोटी लस पुरवठा करणार आहे. या लसीकरणामुळे २०२० च्या अखेरीपर्यंत २२.५ कोटी बालकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे ७ लाख मृत्यू वाचवले जातील.

Contact Us

    Enquire Now