सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ

विशेष ओळख – माई, अनाथांची माय

जन्म – १४ नोव्हेंबर १९४७ पिंप्री मेघे गाव (वर्धा)

मृत्यू – ४ जानेवारी २०२२ (पुणे, महाराष्ट्र)

शिक्षण – चौथीपर्यंत मराठी शाळेत

विवाह – वयाच्या ९व्या वर्षी

जीवनपरिचय –

 • अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले.
 • वयाच्या ७४व्या वर्षी निधन
 • दीड हजाराहून अधिक अनाथ मुला मुलींचे त्या संगोपन करीत होत्या.
 • काव्याची पखरण करीत सोप्या शैलीमध्ये संवाद साधणाऱ्या व त्यांच्या वक्तृत्वाची भुरळ पाडणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना २०२१ मधे ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • सिंधुताईंनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात “ममता बाल सदन” या संस्थेची स्थापना केली.
 • उद्देश – अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी

सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या संस्था –

 • बाल निकेतन हडपसर, पुणे
 • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह – चिखलदरा
 • अभियान बाल भवन – वर्धा
 • गोपिका गायरक्षण केंद्र – वर्धा
 • सप्तसिंधू महिला आधार संगोपन व शिक्षण संस्था – पुणे

विशेष –

 • सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला “मी सिंधुताई सपकाळ” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
 • त्यांच्या जीवनावर भार्गव फिल्म ॲण्ड प्रॉडक्शन निर्मित ‘अनाथांची यशोदा’ हा अनुबोधपट निघाला होता.
 • पुरस्कार – सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
 • २०२१ – पद्मश्री पुरस्कार
 • २०१२ – महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार
 • २०१० – महाराष्ट्र शासनाचा “अहिल्याबाई होळकर” पुरस्कार
 • २०१३ – मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
 • लोकसत्ता तर्फे सह्याद्रीची हिरकणी हा पुरस्कार

Contact Us

  Enquire Now