
साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार २०२०
- साहित्य अकादमीतर्फे २०२० चे अनुवादासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- त्यात मराठीतील अनुवादासाठी सोनाली नवांगुळ आणि संस्कृतमधील अनुवादासाठी डॉ. मंजूषा कुलकर्णी यांना २०२० चे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- पुरस्कारासाठी २०१४ ते २०१८ या काळात प्रसिद्ध झालेली पुस्तके विचारात घेण्यात आली होती.
- त्यात मराठी, संस्कृत, कोकणीसह अन्य भाषांचाही समावेश होता.
सोनाली नवांगुळ – मराठी अनुवाद पुरस्कार
- कोल्हापूर येथील लेखिका व लोकमतमध्ये सातत्याने लेखन करणाऱ्या सोनाली नवांगुळ यांना मराठीतील अनुवादासाठी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला.
- अनुवादित कादंबरी – ‘इरंदाम जमांगलिन कथई’ या तमिळ कादंबरीचे ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे.
विशेष बाबी
- प्रादेशिक भाषेतून हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.
- ही कादंबरी स्वातंत्र्याचा आग्रह धरणारी आहे.
- सोनाली नवांगुळ या भारतातल्या ‘स्पर्शज्ञान’ नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून ‘रिलायन्स दृष्टी’ या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात.
- सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या ‘आखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषविले आहे.
डॉ. मंजुषा कुलकर्णी – संस्कृत अनुवाद पुरस्कार
- मंजूषा कुलकर्णी यांना संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला.
- डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरील ‘प्रकाशवाटा’ या मराठी पुस्तकाचा ‘प्रकाशमार्ग’ या नावाने त्यांनी संस्कृतमध्ये अनुवाद केला आहे.
- मराठीतून संस्कृतमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला प्रथमच पुरस्कार मिळाला आहे.
कोकणी अनुवाद पुरस्कार
- जयश्री शानभाग यांना ‘स्वप्न सारस्वत’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.
साहित्य अकादमी पुरस्कार
- साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार.
- स्थापना : १२ मार्च १९५४
- मुख्यालय : दिल्ली
- भारतातील २४ भाषांसाठी (भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील २२ भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी) हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
अनुवादासाठी पुरस्कार
- दरवर्षी २४ भाषांसाठी दिला जातो.
- सुरुवात – १९८९
- स्वरूप – ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह
- २०१९ चा मराठी भाषेसाठीचा अनुवाद पुरस्कार सई परांजपे यांना प्रख्यात अभिनेते नासिरुद्दीन शाह यांच्या ‘And then one day’ आत्मचरित्राचे ‘आणि मग एक दिवस’ या नावाने मराठीत केलेल्या अनुवादासाठी.