साडेतीन महिन्यांच्या ऐवजी कुंभमेळा 48 दिवसांचा

 साडेतीन महिन्यांच्या ऐवजी कुंभमेळा 48 दिवसांचा

  • हरिद्वार (उत्तराखंड) मध्ये 2021 साली होणारा कुंभमेळा हा साडेतीन महिन्यांऐवजी 48 दिवसांचा होईल व भाविकांना या काळात शाही स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेता येईल.
  • उत्तराखंड राज्याचे नागरी विकास मंत्री मदन कौशिक यांनी ही माहिती दिली व त्यासंबंधीची अधिसूचना फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात येईल.
  • कुंभमेळ्यासाठी एकूण 17.34 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 कुंभमेळा

  •  हा भारतातील एक प्रमुख हिंदू उत्सव आहे.
  • हा उत्सव 12 वर्षांच्या चक्रामध्ये दर 3 वर्षांनी खालील 4 पवित्र नदीकिनारी असलेल्या ठिकाणी साजरा केला जातो
    1. अलाहाबाद (प्रयाग) गंगायमुनासरस्वती संगम.
    2. हरिद्वार गंगा नदी.
    3. नाशिक -गोदावरी नदी.
    4. उज्जैन -क्षिप्रा नदी.
  • युनेस्कोच्या (UNESCO) भारतातील अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कुंभमेळ्याला स्थान मिळाले आहे.
  • हिंदू तत्ववेत्ता व संत ‘आदी शंकर’ यांना या उत्सवाचे पारंपरिक श्रेय दिले जाते. त्यांनी भारतीय उपखंडातील हिंदू तत्त्वज्ञान विषयक चर्चा व वादविवाद करण्यासाठी हिंदू संमेलनाचे प्रयत्न केले.
  • कुंभमेळ्याची नेमकी सुरुवातीचा पुरावा सापडत नाही परंतु ऐतिहासिक हस्तलिखित व शिलालेखावरून ‘माघ मेळादर 6 किंवा 12 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात हिंदू यात्रेकरू एकत्र जमून नदी किंवा पवित्र कुंडात स्नान करतात’ असा उल्लेख भेटतो.
  • इसवीसनाच्या 7व्या शतकात चिनी बौद्ध प्रवासी युआन त्संग (hiuen tsang) यांनी आपल्या प्रवास वर्णनात राजा हर्षवर्धन च्या काळामध्ये त्याची राजधानी प्रयाग येथे लाखो यात्रेकरू उत्सवासाठी जमलेले नमूद केले आहे.
  • हा सण ‘जगातील सर्वात मोठा शांततापूर्ण मेळावा’ व याला ‘धार्मिक यात्रेकरूंची जगातील सर्वात मोठी मोठे संमेलन’ म्हणून मानले जाते.
  • प्राचीन ग्रंथांनुसार अलाहाबाद, नाशिक, हरिद्वार, उज्जैन या चार ठिकाणी अमृत सांडल्याने तेथे स्नान केल्यास आपले पाप धुवून जाईल याकरिता यात्रेकरू तेथे जमतात.

 UNESCO  अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी-

  • सांस्कृतिक वर्षाची विविधता दर्शवण्यासाठी व तिचे महत्त्व जाणून घेण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी 2008 मध्ये ही यादी बनलेली आहे.
  • जर समुदायाने गटाने किंवा संबंधित व्यक्तीने त्यांच्या मुक्त व पूर्वसूचित आणि माहितीच्या संमतीने जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यास त्या गोष्टीचा यादीमध्ये समावेश होतो.
  • या यादीमध्ये भारतातील एकूण 13 गोष्टींचा समावेश आहे. उदा. योगा, नवरोज, छाहू नृत्य, वैदिक जप, बौद्ध जप (लडाख) इत्यादी.

Contact Us

    Enquire Now