साक्षरता दरात केरळ राज्य अव्वल
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयद्वारा आयोजित राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NS) च्या ७५ व्या फेरीनुसार केरळ राज्य, ९६.२% दराने अव्वल (अंदमान-निकोबार वगळता संपूर्ण भारताचा समावेश आहे.)
प्रथम ५ राज्ये केंद्रशासित प्रदेश
१) केरळ (९६.२%) २) दिल्ली (८८.७%)
३) उत्तराखंड (८७.६%) ४) हिमाचल प्रदेश (८६.६%)
५) आसाम (८५.९%)
शेवटची राज्ये
१) मध्यप्रदेश (७३.७%) २) उत्तरप्रदेश (७३%)
३) तेलंगणा (७२.८%) ४) बिहार (७०.९%)
५) राजस्थान (६९.७%) ६) आंध्रप्रदेश (६६.४%)
एकूण साक्षरता प्रमाण – ७७.७%
ग्रामीण भागात – ७३.५%, शहरी भागात – ८७.७%
- साक्षरता दर – ७ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील साक्षर व्यक्तींची टक्केवारी
- राष्ट्रीय स्तरावर पुरुष साक्षरता – ८४.७%; स्त्री साक्षरता – ७०.३%
राज्यांमध्येही पुरुष साक्षरता महिलांपेक्षा जास्त आहे.
१) केरळ – पुरुष साक्षरता – ९७.४% स्त्री साक्षरता – ९५.२%
२) दिल्ली – पुरुष साक्षरता – ९३.७% स्त्री साक्षरता – ८२.४%
वाईट कामगिरी करणार्या राज्यांत पुरुष-स्त्री साक्षरतेत बरीच तफावत आहे.
१) आंध्रप्रदेश – पुरुष – १३.४% स्त्री – ५९.५%
२) राजस्थान – पुरुष – ८०.८% स्त्री – ५७.६%
३) बिहार – पुरुष – ७९.७% स्त्री – ६०.५%
- अहवालानुसार १५.२९ वयोगटातील ग्रामीण भागातील – २४% व शहरी भागातील ५६% लोक संगणक वापरू शकतात.
- सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MSPI) राज्यमंत्री – (स्वतंत्र प्रभार) – राव इंद्रजित सिंह
- सचिव – प्रवीण श्रीवास्तव NSS महासंचालक, विजयकुमार