सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती
- पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असल्याने राज्यभरातील ४७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आली.
- निवडणुकीबाबतचे नियम अंतिम होईपर्यंत या सोसायट्यांच्या निवडणुका होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सहकारी संस्था
- ९७वी घटनादुरुस्ती अधिनियम २०११ अन्वये सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण दिले गेले. कलम २४३ZH ते २४३ZD सहकारी संस्था संबंधित कलम
- या घटनादुरुस्तीद्वारे तीन बदल करण्यात आले.
१) सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार ठरविण्यात आला. कलम १९ (१) (C)
२) सहकारी संस्थांना चालना देण्यासाठी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांत नवीन मार्गदर्शक समावेश
कलम-४३B – सहकारी संस्थांना चालना दिली.
३) ‘सहकारी संस्था’ या नावाच्या ९B या प्रकरणाचा घटनेत नव्याने समावेश करण्यात आला.