सरदार पटेल स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम

सरदार पटेल स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम

  • जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या सरदार पटेल स्टेडियमचे नरेंद्र मोदी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले.
  • एक लाख १० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या भव्य स्टेडियमचे उद्‌घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.
  • स्टेडियमला असलेल्या दोन pavilion  एण्ड्स्पैकी एकाचे नाव अदानी एण्ड आणि दुसऱ्याचे नाव रिलायन्स एण्ड असे आहे.
  • मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले असून क्रीडा संकुलास सरदार पटेल यांचेच नाव कायम आहे.
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात  होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मैदानाचे नाव बदलण्यात आले. हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करून संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स् कॉम्प्लेक्स असे करण्यात आले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाईट कसोटी सामन्याआधी या कॉम्प्लेक्समधील क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे.
  • २०१५ साली हे स्टेडियम पूर्णपणे पाडण्यात आले आणि नव्याने त्याची निर्मिती करण्यात आली. या नव्या स्टेडियममध्ये आधुनिक सुविधा निर्माण केल्या. जुन्या मैदानाची क्षमता ५३ हजार इतकी होती.
  • ६३ एकर परिसरात पसरलेल्या या मैदानावर ऑलिंपिक साइझचे स्विमिंग पूल आहे. तर चार ड्रेसिंग रूम आहेत. स्टेडियमच्या परिसरात बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य कोर्ट आहेत. या परिसरात हॉकी आणि फुटबॉल मैदान देखील आहे. या मैदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ड्रेसिंग रूमला जिम आहे. जे क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळत नाही.
  • मोटेरा येथील जुने मैदान १९८२ साली बांधण्यात आले होते. आता नवे स्टेडियम दोन वर्षांत बांधून पूर्ण झाले. याआधी प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदान सर्वात मोठे होते. याची क्षमता १ लाख इतकी आहे.

Contact Us

    Enquire Now