समृद्धीचा पहिला टप्पा महाराष्ट्र दिनी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १ मे पर्यंत ‘समृध्दी’ महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल व पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन मुंबई पर्यंत वाहतूक सुरू होऊ शकेल अशी घोषणा केली.
- महामार्गाचे पूर्ण नाव ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ आहे.
- महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी असून नागपूर ते मुंबई या २ शहरांना जोडण्यासाठी शीघ्र संचार द्रुत गतीचा असा हा महामार्ग आहे.
- महामार्ग ठाणे, नाशिक, औरंगाबाद इ. अशा १० जिल्ह्यांतून जातो.
- मुंबई – नागपूर प्रवासासाठी सध्या १४-१५ तास लागतात ते अंतर या महामार्गाने फक्त ८ तासात पार केले जाऊ शकते.
- महाराष्ट्रातील इतर द्रुतगती महामार्ग
-
- मुंबई – पुणे = लांबी – ९४.५ किमी (भारतातील सर्वप्रथम ६ पदरी द्रुतगती महामार्ग)