समीर कुमार खरे ADB च्या कार्यकारी संचालकपदी

समीर कुमार खरे ADB च्या कार्यकारी संचालकपदी

  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) समीर कुमार खरे यांना आशियाई विकास बँक (ADB) मनिलाचे नवे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली.
  • समीर कुमार खरे हे १९८९ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आसाम केडरचे अधिकारी आहेत.
  • ते सध्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत आहेत.
  • तीन वर्षांच्या मुदतीसाठी त्यांची या पदावर नेमणूक झाली.

आशियाई विकास बँक (ADB)

  • स्थापना – २२ ऑगस्ट १९६६ (३१ सदस्यांनी ADB च्या स्थापनेवर स्वाक्षर्‍या केल्या.) त्यानुसार, १९ डिसेंबर १९६६ ला ADB अस्तित्वात आली.
  • मुख्यालय – मनिला (फिलीपीन्स)
  • सदस्य – सुरुवातीला ३१ सदस्य होते, ते वाढत जाऊन ६८ झाले आहेत. न्युए हा २०१९ ला सदस्य झालेला ६८ वा देश आहे. ६८ पैकी ४९ सदस्य आशिया – पॅसिफिक प्रदेशातील असून १९ देश इतर प्रदेशांतील आहेत.

उद्दिष्टे

१) आशियाई देशांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे, प्रादेशिक एकीकरण वाढीस लावणे.

२) लैंगिक समानता, ग्रामीण विकास, अन्नसुरक्षा पुरविणे, दारिद्य्र दूर करणे.

  • पर्यावरणीयदृष्ठ्या शाश्वत विकास करणे.
  • अध्यक्ष – ताकेहि को नाकाओ (परंपरेने ADB चा अध्यक्ष हा जपानचा असतो.

Contact Us

    Enquire Now