संयुक्त राष्ट्रांचा अहवाल – जुन्या धरणांपासून वाढता धोका

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल – जुन्या धरणांपासून वाढता धोका

 • ‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर – ॲन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ या शीर्षकाखाली संयुक्त राष्ट्राच्या कॅनडास्थित जल, पर्यावरण व आरोग्य या संस्थेने तयार केला आहे.
 • जगभरातील सुमारे ५५% म्हणजेच ५८,७०० मोठ्या  धरणांपैकी बहुतांश धरणे १९३० ते १९७० या कालावधीत बांधली गेली आहेत, यात ३२,७१६ धरणे भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियात उभारली आहेत.

 

जुन्या धरणांपासून धोका निर्माण होण्याची कारणे:

 

अ) काँक्रीटपासून बनलेली ही धरणे बहुतांश जुनी होऊन त्यांना तडे जाऊन फुटण्याचा धोका

ब) नदीने वाहून आणलेला गाळ धरणांमुळे अडवला जातो. परिणामी, धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होऊन पाणी अशुद्ध बनते. उदा. गंगा नदी.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालाअंतर्गत पुढील देशांतील धरणांचे सर्वेक्षण करण्यात आले: अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, भारत, जपान, झाम्बिया आणि झिम्बाब्वे

भारतातील धरणे :

 • २०२५ पर्यंत – १,११५ मोठी धरणे ५० वर्षांची होणार.
 • २०५० पर्यंत – ४,२५० मोठी धरणे ५० वर्षांहून अधिक, तर ६४ धरणे १५० वर्षांची होणार.
 • केरळमधील शंभर वर्षे जुने मुल्लपेरियार धरण फुटल्यास ३५ लाख लोकांचा जीव धोक्यात.

महत्त्वाचे :

 • जगभरातील मोठ्या धरणांमध्ये ७,००० ते ८,३०० घन किलोमीटर पाणीसाठा (कॅनडाच्या ८०% जमीन व्यापण्याएवढा.
 • ९३% मोठी धरणे २५ देशांत
 • गेल्या चार दशकांपासून मोठी धरणे बांधण्याचे प्रमाण घटले.

इतर माहिती:

 • भारतातील भगीरथी नदीवरील टेहरी धरण हे जगातील आठवे आणि भारतातील सर्वात मोठे धरण असून २६१ मीटर उंचीवर बांधण्यात आले आहे.
 • भाक्रा हिमाचल प्रदेशात सतलज नदीवर असून २२५ मीटर उंच आणि ५२० मीटर लांब आहे.

भारतातील प्रमुख धरणे आणि नद्या :

धरण/जलाशय

नदी धरण/जलाशय

नदी

इडुक्की पेरियार काकरापार तापी
तिलैया बाराकार उकई तापी
नागार्जुनसागर कृष्णा धोम कृष्णा
नाथपा झकीरी सतलज अरुणावती अरुणावती (पैनगंगेची उपनदी)
फराक्का गंगा माटघर येळवंडी
रणजितसागर रावी येलदरी पूर्णा
राणाप्रताप सागर चंबळ मोडकसागर वैतरणा
सरदार सरोवर नर्मदा इटियाडोह गाढवी
गंगासागर चंबळ माणिकडोह कुकडी

Contact Us

  Enquire Now