संभाजी गुरव ‘एव्हरेस्ट वीर’
- मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून तिथे महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकविला.
- गुरव हे एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे तिसरे कर्मचारी ठरले आहेत.
- उणे १९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर चढाई करताना गुरव यांनी काठमांडू येथून चढाई करण्यास सुरुवात केली.
- एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ६५ किलोमीटर्सचा टप्पा त्यांनी पूर्ण करत १७ मे ला कॅम्प २ पर्यंत, १८ मे रोजी कॅम्प ३, १९ मे रोजी कॅम्प ४ आणि २० मे रोजी कॅम्प ४ ते एव्हरेस्ट शिखर अशी चढाई सुरू केली.
- यापूर्वी महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी अशी कामगिरी केली होती.
माऊंट एव्हरेस्ट
- माऊंट एव्हरेस्ट हिमालय पर्वत रांगांतील जगातील सर्वात उंच पर्वतशिखर असून त्याची उंची ८८४८.८६ मीटर्स इतकी आहे.
- ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे.
- नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून तर तिबेटमध्ये चोमो लुंग्मा या नावाने ओळखतात.