संजय दत्तला संयुक्त अरब अमिरातचा ‘गोल्डन व्हिसा’
- संजय दत्तला नुकताच संयुक्त अरब अमिरातचा ‘गोल्डन व्हिसा’ मिळाला आहे. असा व्हिसा मिळवणारा तो पहिला बॉलीवुड अभिनेता ठरला आहे.
- या व्हिसाद्वारे व्यक्ती १० वर्षे या देशात राहू शकतो. सामान्यपणे हा व्हिसा उद्योगपती, गुंतवणूकदार आणि डॉक्टर किंवा तत्सम व्यवसाय असणाऱ्या लोकांना देण्यात येत असे मात्र याच्या नियमांमध्ये नुकताच बदल करण्यात आल्याने संयज दत्तला हा व्हिसा मिळाला आहे.
- UAE ने देशामध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञांचा आणि बुद्धिमान लोकांचा ओघ वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- कोरोना महामारीमुळे अनेक देशातील विविध क्षेत्रातील लोकांनी आखाती देशांमधून काढता पाय घेतला होता. त्यांना परत आकर्षित करण्यासाठी ‘गोल्डन व्हिसा’च्या नियमात बदल केला आहे.
- शास्त्रज्ञ, उद्योजक, गुंतवणूकदार यांच्याबरोबरच असामान्य शालेय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा व्हिसा दिला जातो.