श्रेयांक पद्धतीत एकसमानता आणण्यासाठी तज्ज्ञ समिती
- केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्यात ‘चॉईसबेस्ड क्रेडिट सिस्टम’ म्हणजे पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती लागू करण्याबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत.
- परंतु प्रत्येक विद्यापीठाद्वारे श्रेणीचे रूपांतर गुणांमध्ये करण्याच्या सूत्रात विविधता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवण्यासाठी एकत्रित श्रेयांक सरासरी गुणांचे (CGPA) टक्केवारीत रूपांतर करताना होणारी असमानता दूर करण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार श्रेणीवाटप करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
- या समितीचे अध्यक्ष सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी व इतर ८ सदस्यांचा समावेश असेल.
- सन २०१५-१६ पासून केंद्राच्या सूचनांनुसार सीबीसीएस श्रेयांक पद्धती राबविली जात आहे. विद्यापीठांकडून सीजीपीएननुसार विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येतात. मात्र श्रेणीचे रूपांतर गुणांत विविध विद्यापीठांत विविध पद्धतीने होते. यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.
- उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समितीने एका महिन्याच्या आत शासनाला अहवाल देणे अपेक्षित आहे.