श्रीलंकेतील दहशतवादी संघटनावर बंदी
- श्रीलंकेतील दहशतवादी कारवायाशी संबंधित असलेले आयसिस आणि अल-कायदा यांच्यासह ११ जहाल इस्लामी संघटनावर श्रीलंकेत बंदी घालण्यात आली.
- श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष यांनी या बाबतची अधिसुचना जारी केली.
- बंदी घातलेल्या संघटनामध्ये श्रीलंका इस्लामिक स्टुडण्टस मुव्हमेण्ट यासह स्थानिक मुस्लिम गटांचा समावेश आहे.
- अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांना ४० ते २० वर्षांची शिक्षेची तरतूद केली आहे.
- २०१९ मध्ये श्रीलंकेत इस्टर संडे आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यानंतर नॅशनल तौहिथ जमात व अन्य दोन संघटनावर त्वरीत बंदी घालण्यात आली.
- श्रीलंकेचे माजी अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी २०१९ मध्ये विशेष तपास पथक स्थापन केले होते.
- दहशतवादी बौद्ध गटावरही बंदी घालण्याची शिफारस केली होती, पण त्या गटाला या बंदीतून वगळण्यात आले आहे.