शौय पुरस्कार, २०२१

शौय पुरस्कार, २०२१

  • देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांना २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • २०१९ मध्ये हवाई युद्धात पाकिस्तानचे F-१६ लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपतींद्वारा वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
  • कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सचे सॅपर शहिद प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले.
  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शहीद नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

शौर्य पुरस्कारांविषयी

  • सुरुवात : २६ जानेवारी १९५० (१५ ऑगस्ट १९४७ पासून प्रभावी)
  • प्रथम परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र असे तीन शौर्य पुरस्कार जाहीर झाले.
  • त्यानंतर ४ जानेवारी १९५२ मध्ये भारत सरकारने अशोक चक्र-I, अशोक चक्र-II, व अशोक चक्र-III असे तीन श्रेणीत इतर शौर्य पुरस्कार जाहीर केले; ज्यांचे १९६७ मध्ये अनुक्रमे अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र असे नामांतर करण्यात आले.

कोणता शौर्य पुरस्कार कधी दिला जातो व आतापर्यंतचे मानकरी

युद्ध काळात दिले जाणारे पुरस्कार

क्र. पुरस्काराचे नाव कधी देतात इतर एकूण मानकरी
१) परमवीर चक्र युद्धातील शौर्य व बलिदानासाठी मरणोत्तर मेजर सोमनाथ शर्मा पहिले मानकरी २१
२) महावीर चक्र असाधारण शौर्य व बलिदान (मरणोत्तरही देतात) दुसरा सर्वोच्च शौर्य सन्मान २१२
३) वीर चक्र युद्धादरम्यान अदम्य साहस व पराक्रम तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार १३२४
शांतता काळात दिले जाणारे पुरस्कार
१) अशोक चक्र युद्धात अतुलनीय शौर्य, साहस व बलिदान युद्धादरम्यानच्या परमवीर चक्राप्रमाणेच महत्त्व ९७
२) कीर्ती चक्र असाधारण शौर्य आणि बलिदान सैनिक तसेच गैर-सैनिकांना ४८३
३) शौर्य चक्र सशस्त्र दलातील जवानांना असाधारण शौर्य कांस्य धातूचे पदक

Contact Us

    Enquire Now