शिसे (lead) प्रदूषण

शिसे (lead) प्रदूषण

  • जगातील ८०० मिलियन मुलांवर शिस्याच्या प्रदूषणाचा हानिकारक परिणाम होत आहे, असे The Toxic Truth अहवालात युनिसेफने सांगितले आहे.
  • हा अहवाल युनिसेफ, Institute of Health Metrics Evaluation यांनी बनवला आहे.

अहवालातील निरीक्षणे :

१) शिशाच्या प्रदूषणाचा वयवर्षे ५ खालील मुलांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तसेच भविष्यात त्यांना विविध शारीरिक व मानसिक आजार लागण्याचाही धोका उद्भवतो.

२) शिशाच्या या मानसिक परिणामांमुळे लहान मुलांमध्ये वर्तनविषयक समस्या निर्माण होतात आणि ते गुन्हेगारीच्या मार्गाकडे जाण्याचा धोका वाढतो.

३) अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे त्या त्या देशातील मानवी संसाधनही वाया जाते. विकसनशील व गरीब राष्ट्रांना शिशाच्या प्रदूषणामुळे $१ ट्रिलियन एवढा तोटा होतो.

शिसे :

  • स्रोत- पेट्रोल, डिझेल, लिड बॅटरी, रंग, केसांचा डाय, उद्योगधंदे
  • पर्यावरणावरील परिणाम- झाडांची वाढ खुंटणे, प्रजनन चक्र बदलणे.
  • International Lead Poisoning week of Action- २५-३१ ऑक्टोबर २०२०(WHO)

Contact Us

    Enquire Now