शाळेच्या परिसरात ‘जंक फूड’च्या विक्रीला बंदी

शाळेच्या परिसरात ‘जंक फूड’च्या विक्रीला बंदी

  • फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर व जाहिरातीवर बंदी घातली आहे.
  • FSSAI अन्न सुरक्षा आणि मान कायद्यानुसार नवीन तत्त्वे लागू करत आहे. शालेय मुलांसाठी दर्जेदार आणि पौष्टिक आहार देणे हा त्याचा हेतू आहे.
  • २०१५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने FSSAI ला शाळेच्या कँटीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवरील नियम घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाळेत कँटिन सुरू करण्यासाठी FSSAI कडून परवाना घ्यावा लागतो. मुलांना सुरक्षित, चांगले भोजन मिळावे यासाठी शाळेच्या जागेची नियमित तपासणीही पालिका अधिकारी व राज्यशासन करणार आहे.

Contact Us

    Enquire Now