वीरा साथीदार

वीरा साथीदार

जन्म – 1960

निधन – 13 एप्रिल 2021

मुळगाव – सेलू (वर्धा)

अल्पपरिचय:

 • अभिनेता, लेखक, गीतकार, पत्रकार
 • नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले
 • नाट्यकलेची आवड, काही वर्षे दलित रंगभूमीत सक्रिय होते
 • त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता

विशेष कामगिरी:

 • दलित पॅंथर संघटनेच्या माध्यमातून वंचितांसाठी काम
 • आंबेडकर चळवळीतील अनेक गाणी त्यांनी स्वतः लिहिली व गायली
 • ‘विद्रोही’ या मासिकाचे संपादन केले
 • पत्रकार म्हणून त्यांनी शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होता
 • चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती
 •  कोर्ट या मराठी चित्रपटाला 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अंतर्गत सुवर्णकमळाचा सर्वोच्च मान मिळाला होता; तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे एकूण १८ पुरस्कार प्राप्त झाले होते
 • कोर्ट हा चित्रपटला ऑस्करच्या ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ साठी निवडला गेला होता

Contact Us

  Enquire Now