विवेक राम चौधरी नवे हवाई दल प्रमुख

विवेक राम चौधरी नवे हवाई दल प्रमुख

  • भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी विवेक राम चौधरी यांची २७ सप्टेंबर २०२१ रोजी नेमणूक करण्यात आली आहे.
  • त्यांनी एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदौरिया यांची जागा घेतली.
  • व्ही. आर. चौधरी हे २७वे एअर चीफ मार्शल ठरले आहेत.
  • साधारणत: भारतीय संरक्षण दलातील प्रमुखाची निवड दोन-तीन महिने आधीच जाहीर केली जाते, जेणेकरून संबंधित व्यक्ती येणाऱ्या जबाबदाऱ्यांविषयी परिचित व्हावी, मात्र चौधरी यांना पदाची जबाबदारी अवघ्या ९ दिवसांतच सांभाळावी लागेल.

परिचय

  • जन्म : ४ सप्टेंबर १९६२
  • यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा, परंतु वडील हैदराबाद येथे स्थायिक झाल्याने शालेय शिक्षण तिकडेच पूर्ण केले.
  • लष्करी शिक्षण : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण करून २९ डिसेंबर १९८२ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झाले.
  • चौधरी यांना तब्बल ३८०० तास उड्डाणाचा अनुभव असून यात मिग २१, मिग २३ एमएफ, मिग २९ यासारख्या विमानांचा समावेश आहे.

भूमिका :

  • राफेल खरेदी प्रक्रियेसाठीच्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते.
  • पाकिस्तानी लष्कराने १९८४ मध्ये सियाचीनवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरुद्धच्या भारतीय लष्कराच्या ‘मेघदूत’ मोहिमेत ते सहभागी होते.
  • कारगील युद्धाचा एक प्रमुख हिस्सा असलेल्या ‘ऑपरेशन सफेद सागरचा’ देखील ते एक भाग होते.
  • पश्चिम दलाच्या हवाई विभागाकडे चीन आणि लडाख क्षेत्राची जबाबदारी असून या क्षेत्रात भारत-चीन सैन्य १६ महिने समोरासमोर उभे होते. यावेळी या विभागाचे हवाई अधिकारी म्हणून चौधरी यांनी पदभार सांभाळला.
  • लढाऊ आणि प्रशिक्षक विमानांचे परिक्षक, मिग २९ तुकडीचे प्रमुख तसेच बेस्ट कमांडंट, हवाई दल प्रबोधिनीचे डेप्युटी कमांडर, हवाई संरक्षण विभागाचे सहाय्यक प्रमुख म्हणून कारभार सांभाळला आहे.
  • एअर चीफ मार्शल पदाचा कारभार सांभाळण्यापूर्वी चौधरी १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत हवाई दलाचे उपप्रमुख या पदावर कार्यरत होते.

सन्मान :

  • २०१५ : अतिविशिष्ट सेवा पदक
  • २०१८ : वायुसेवा पदक
  • २०२१ : परमविशिष्ट सेवा पदक

Contact Us

    Enquire Now