विवेक (तमिळ अभिनेता)
- जन्म : १९ नोव्हेंबर १९६१
- जन्मस्थळ : नाला गाव, तिरुनेलवेली (जिल्हा) तमिळनाडू
- मृत्यू : १७ एप्रिल २०२१ चेन्नई
अल्प परिचय
- लोकप्रिय तमिळ विनोदी अभिनेते विवेक यांचे हृदयाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
- ते ५९ वर्षांचे होते.
- विवेक हे अभिनेता तर होतेच त्याचबरोबर पटकथा लेखक, आणि गायकही होते.
- ते महाविद्यालयीन शिक्षण घेताना विविध प्रकारच्या अतिरिक्त अभ्यासक्रमात भाग घ्यायचे.
- पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी तमिळनाडू सरकारमध्ये सचिव म्हणून काम केले. त्यासोबतच ह्यूमर क्लबमध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम केले होते.
- ह्यूमर क्लबचे संस्थापक पीआर गोंविदराजन यांनी विवेक यांची ओळख भारतीय चित्रपट दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्याशी केली. त्यामुळे विवेक यांना चित्रपटात पटकथा लेखक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
- १९८७ मध्ये ते “मानयिल उरुथी वेदुम” या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले व अभिनेत्री सुहासिनीच्या भावाची भूमिका साकारली.
- ते एक हरित पर्यावरणीय कार्यकर्ते होते.
- त्यांनी ६ जून २०१९ रोजी पर्यावरण दिनानिमित्त १०००० झाडे लावली.
- त्यांनी हिरव्यागार वातावरणाला चालना देण्यासाठी “थुईमाई अरुणाई”ची ‘गो ग्रीन इनिशिएटिव्ह’ ही एक एनजीओ सुरू केली.
- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी “ग्रीन ग्लोब प्रॉजेक्ट”, ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध मोहिमेला चालना देण्यासाठी काम केले.
- त्यांना प्लॅस्टिकमुक्त तमिळनाडू या मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- विवेक यांना “ज्यूनियर कलैवयनर” असेही म्हटले जात असे.
- विवेक यांचा शेवटचा चित्रपट इंडियन २
पुरस्कार आणि सन्मान
क्रमांक | कार्यक्रम | वर्ष | पुरस्कार | चित्रपट |
१) | सत्यभामा विद्यापीठ | २०१५ | मानद डॉक्टरेट | |
२) | नागरी सन्मान | २००९ | पद्मश्री – सिनेमातील योगदान | |
३) | तमिळनाडू राज्य चित्रपट मानद पुरस्कार | २००६ | कलाविणार पुरस्कार | |
४) | फिल्मफेअर ॲवॉर्ड्स दक्षिण | २००२
२००३ २००४ |
सर्वोत्कृष्ट विनोदी तमिळ | चालवा
साथ पेराझागन |
५) | तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार | १९९९
२००२ २००३ २००५ २००७ |
बेस्ट कॉमेडियन | अननरुगे नान इरुंथल
चालवा पर्थिबन कानबु अनियान शिवाजी |
६) | आंतरराष्ट्रीय तमिळ फिल्म पुरस्कार | २००३
२००४ २००८ २०११ |
बेस्ट कॉमेडियन | चालवा
साथ कुरुवी वेदी |
- एशियनेट फिल्म पुरस्कार २००९ – सर्वोत्कृष्ट विनोदीचा एशियनेट पुरस्कार
- एडिसन पुरस्कार – २००७ – सर्वोत्कृष्ट विनोदी – सिनेमा – गुरु एन आलु