विरुपाक्ष कुलकर्णी
जन्म : १९४०
मृत्यू : १६ एप्रिल २०२१
परिचय :
- प्रसिद्ध अनुवादक विरुपाक्ष कुलकर्णी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
- अनुवादाच्या माध्यमातून मराठी आणि कन्नड भाषेचा शब्दबंध घट्ट करणारे अनुवादक होते.
- मराठीतील साहित्यकृती कन्नडमध्ये अनुवाद करत होते. या कार्यात त्यांना पत्नीची साथ होती.
- त्यांच्या पत्नी उमा कुलकर्णी ह्या कन्नड साहित्य मराठीमध्ये अनुवाद करत.
- विरुपाक्ष कुलकर्णी यांनी संरक्षण खात्याच्या उच्च क्षमता स्फोटके कारखान्यात इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून अनेक वर्षे काम केले.
- वाचन आणि लिखाणाच्या आवडीतून कुलकर्णी दाम्पत्याने अनुवादाच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून घेतले.
- विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “माझी जन्मठेप” हे पुस्तक विरुपाक्ष कुलकर्णी यांनी अनुवादीत करत अनुवादाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले.
- त्यांनी २० पुस्तकांचा कन्नडमध्ये अनुवाद केला आहे.
- ज्यामध्ये सुनिता देशपांडे यांचे “आहे मनोहर तरी” भैरप्पा-कारंथ लेखन समीक्षा विश्वनाथ खैरे यांचे मिथ्यांचा मागोवा इत्यादी साहित्य कृतींचा समावेश
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पु. ल. देशपांडे यांचे साहित्य आणि बाबा आमटे यांचे चरित्रही त्यांनी मराठीतून कन्नडमध्ये अनुवादित केले आहे.