विभागीय हवाई कनेक्टिव्हिटीला चालना देणाऱ्या आठ नव्या हवाई मार्गांचे उद्‌घाटन

विभागीय हवाई कनेक्टिव्हिटीला चालना देणाऱ्या आठ नव्या हवाई मार्गांचे उद्‌घाटन

  • मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यानच्या प्रवासासाठीच्या नवीन आठ हवाई मार्गांना  केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
  • या सर्व आठ नवीन मार्गांवर एम/एस स्पाईस जेटतर्फे विमान उड्डाणे सुरू होतील. ग्वाल्हेर-मुंबई-ग्वाल्हेर, ग्वाल्हेर-पुणे-ग्वाल्हेर, जबलपूर-सुरत-जबलपूर आणि अहमदाबाद-ग्वाल्हेर-अहमदाबाद असे हे आठ मार्ग आहेत.
  • उडान या योजनेतील मार्गामधील ग्वाल्हेर हा मध्य प्रदेशातील पहिल्या हवाईतळापैकी एक आहे, आणि अधिकच्या विभागीय हवाई मार्गांमुळे वाढीला लागणाऱ्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बंगळूरू, हैदराबाद, कोलकाता आणि जम्मू या शहरांशी ग्वाल्हेर उडान योजने अंतर्गत हवाईमार्गाने जोडलेले आहे तसेच ते नियमित हवाईमार्गाने मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या शहरांशीही जोडले गेलेले आहे. ग्वाल्हेर फोर्ट, सास बहू मंदिर, मोहम्मद गौंसची कबर, फुलबाग, गुजरी महल वस्तुसंग्रहालय, तेली का मंदिर, ग्वाल्हेर प्राणीसंग्रहालय, मोती महाल आणि ही जय विलास पॅलेस अशासारख्या अनेक ऐतिहासिक इमारतींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. नवीन हवाई मार्गामुळे ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशातील पर्यटनाच्या शहराला हवाई कनेक्टिव्हिटीचा आधार मिळेल तसेच भारतातील महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या व्यापारी केंद्रांत ते जोडले जाणार असल्यामुळे आर्थिक उलाढालीलाही चालना मिळेल.
  • देशातील टीयर-२ आणि टीयर-३ दर्जांच्या शहरांची महानगरांसोबतची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाचे उद्दिष्ट या हवाई मार्गांमुळे साध्य होईल. या उद्घाटनानंतर मध्य प्रदेशातील जबलपूर हवाईतळ, बेंगलोर हैदराबाद आणि पुणे या नियमित हवाई मार्गे आणि बिलासपुर योजनेअंतर्गत मार्गाने जोडला जाईल. जबलपूर हे मध्यप्रदेशचे प्रशासकीय आणि शैक्षणिक केंद्र आहे. धुआँधार धबधबा, मदन महल किल्ला, बॅलन्सिंग रॉक, बार्गी धरण, गुरुद्वारा ग्वारीघाट साहिब, डुमना नेचर रिझर्व पार्क अशा खास वैशिष्ट्यांमुळे हे शहर म्हणजे मुख्य पर्यटन केंद्रसुद्धा आहे.
  • अस्तित्वात असलेले देशांतर्गत हवाई जाळे अधिक मजबूत करण्याचे तसेच उडान योजनेचे ‘सब उडे़ सब जुड़े’ हे उद्दिष्ट या मार्गांच्या उद्‌घाटनामुळे साध्य होईल याशिवाय स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटन याला चालना देणे ही उद्दिष्टेही त्यामुळे सफल होतील.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now