विनेश फोगटला सुवर्णपदक
- कोरोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने पुनरागमन केले आहे. विनेशने २०१७च्या विश्वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्काला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.
- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली.
- विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. मग कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी साधली. मग विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. पण शेवटी विनेशने १०-८ अशा फरकाने लढतीत वर्चस्व गाजवले.
- कोरोनाच्या साथीनंतर विनेश या पहिल्याच स्पर्धेत सहभागी झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
- विनेश फोगटने २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या अशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
- २०२० मध्ये तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.