विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% दप्तराचे ओझे
- पुढील शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी करण्यासाठी केंद्राने धोरण आखले आहे.
धोरण मसुदा –
- पहिली ते दुसरीसाठी एक वही
- तिसरी ते पाचवीसाठी वर्गपाठ आणि गृहपाठाच्या अशा दोन वह्या
- सहावीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टे कागद आणण्याची मुभा
- कागद संकलित करून ते टाचून (फायलिंग) कसे ठेवावे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे.
- शाळांनी मध्यान्ह भोजन आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- अधिक वह्या, पुस्तके आणावी लागणार नाहीत असे वेळापत्रक.
- प्रत्येक पाठ्यपुस्तकावर त्याचे वजनही छापावे व त्यानुसार वेळापत्रक निश्चित करावे.
- शिक्षकांनी वारंवार विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे.
दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत न्यायालयातही याचिका दाखल झाल्यानंतर केंद्रशासनाने धोरण तयार करण्यासाठी 2018 मध्ये तज्ज्ञांची समिती नेमली होती.
धोरणातील इतर मुद्दे –
- चाके असलेली दप्तर नको
- गृहपाठही कमी
इयत्ता | गृहपाठ (तास/आठवडा) |
पूर्व प्राथमिक ते तिसरी | – |
तिसरी ते पाचवी | 2 |
सहावी ते आठवी | 5-6 |
नववी ते बारावी | 10-12 |
कोणत्या इयत्तेसाठी किती वजनाचे दप्तर –
इयत्ता | विद्यार्थ्याचे वजन | दप्तराचे वजन (किग्रॅ) |
पूर्वप्राथमिक | 10 – 16 | दप्तर |
पहिली, दुसरी | 16 – 22 | 1.6 ते 2.2 |
तिसरी ते पाचवी | 17 – 25 | 1.7 ते 2.5 |
सहावी, सातवी | 20 – 30 | 2 ते 3 |
आठवी | 25 – 40 | 2 ते 5.4 |
नववी, दहावी | 25 – 45 | 2.5 ते 4.5 |
अकरावी, बारावी | 35 – 50 | 3 ते 5.5 |
- महाराष्ट्र राज्याने यापूर्वीच 2014 दप्तराचे ओझे कमी करण्यासंबंधीचे धोरण अंमलात आणले आहे.
- गरज – 10-15 वर्षात, 10 – 12 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये पाठदुखी व मणक्यावर ताण पडून उंची खुंटण्याचे प्रमाण वाढत आहे.